ठाणे: राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाने शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच जोरदार धक्का दिला आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या किसननगरमधील शाखाप्रमुखासह ३०० शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी शिवसैनिकांचे स्वागत केले.
शिवसेनेच्या किसननगर नं. २ चे शाखाप्रमुख समीर नार्वेकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेचे निरीक्षक निलेश लोहोटे, उपशाखाप्रमुख पंकज परब, भरत देसाई, आशिष चव्हाण, नितेश पवार यांच्यासह ३०० शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांत किसननगर नं. १, २, ३ आणि चारबरोबरच पडवळनगरमधील शिवसैनिकांचा समावेश आहे.
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असून, किसननगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. किसननगरमधूनच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड होत होती. या भागात शिवसेनेचे संघटनात्मक जाळे मजबूत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मात्र, भाजपने शिवसेनेच्या किसननगरमधील अभेद्य तटबंदीलाच खिंडार पाडले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘तुम्ही शिवसेनेचं प्रोडक्ट आहात’; दादा भुसेंचा नारायण राणेंना खोचक टोला
‘बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच…’; के चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य
“महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ, हजार किलोमीटरचे अंतर असूनही…”, चंद्रशेखर राव यांचे मोठे विधान
‘सुडाचं राजकारण ही हिंदुत्वाची संस्कृती नाही’; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

