🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताने कोरोनाविरूद्ध १०० कोटी लसीकरणाचा विक्रम केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे. त्यांनी या विक्रमाला बेंचमार्क असं म्हटले आहे. यशाचं श्रेय पंतप्रधानांनी देशातील जनतेला दिलं आहे. गुरुवारी सकाळी भारताने ‘लसीकरण शतकाची’ कामगिरी केली. या निमित्ताने देश आणि जगातील अनेक नेत्यांनी अभिनंदन केलं. जागतिक आरोग्य संघटनेनेही देशाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोदींनी देशाने कोरोनाविरोधातील लढाईत मिळवलेल्या यशाचा उल्लेख करतानाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोठे आवाहन केले आहे. या दिवाळीच्या सणाला शक्यतो मेड इन इंडिया, भारतातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन केले.
‘आज लसीकरणाचा वेग वाढला असून क्रीडा, मनोरंजन सर्वच क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडत आहेत. मेड इन इंडियाची ताकद मोठी आहे. छोट्यात छोटी मेड इन इंडिया वस्तू खरेदी करण्यावर जोर द्या. सगळ्यांच्या प्रयत्नाने हे शक्य होईल. ज्याप्रमाणे स्वच्छ भारत जनआंदोलन झाले तसेच भारतात बनवलेल्या वस्तू व्होकल फॉर लोकल हे तत्व आचारणात आणले पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगेन की आपण प्रत्येक लहान वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला पाहिजे, जी भारतात बनली आहे असे मोदी म्हणाले.
‘कितीही चांगले चिलखत, कितीही आधुनिक चिलखत असले तरी, चिलखतीपासून संरक्षणाची संपूर्ण हमी आहे तरी युद्ध चालू असतानाही शस्त्रे फेकली जात नाहीत. मी विनंती करतो की आपण आपले सण अत्यंत काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत. देशाला मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे माहित आहे. पण, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहू नये’ असे ते म्हणाले.
आपल्याला जशी चपला घालूनच घराबाहेर पडण्याची सवय झालेली आहे. तशीच मास्कचीही सवय लावून घ्या. लसीकरणाने १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे.पण अद्यापही लस न घेतलेल्यांनी मास्कला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी कोरोनाविरोधातील लस घेतली आहे, त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयत्न केल्यास कोरोनाला लवकर पराभूत करू शकू. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही येणारे सण पूर्ण खबरदारी घेऊन साजरे करा, असेही मोदींना आपल्या संबोधनामध्ये सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला-धनंजय मुंडे
- ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार
- ‘तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा!’, राऊतांचा शायरीतून सोमय्यांवर वार
- ‘राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलीस यंत्रणा दरोडेखोरांना कसं पकडणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
