🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झालेले राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणीदेखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय न होऊ देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्ष वाढीसाठी काम करू असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री संजय बनसोडे आदींच्या उपस्थितीत हा प्रवेश साेहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अंबाजोगाईची नगर परिषदेतील सत्ता अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले पापा मोदींनी त्यांचे शेकडो समर्थकांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अंबाजोगाईची नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाने बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद नक्कीच वाढेल. अंबाजोगाई नगरपालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय दौंड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार बसवराज पाटील, पृथ्वीराज साठे, सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, संजय वाघचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदींचीही उपस्थिती हाेती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
