औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीनजवळ तोंडोळी (ता. पैठण) येथील शेतवस्तीत राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री ११ च्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला चढवला. घरातील पुरुषांना दोरीने बांधून १५ हजारांची लूट केली. इतकेच नव्हे तर घरातील दोन महिलांवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कारही केला. या महिलांना उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक पीडिता पाच महिन्यांच्या बाळाची आई आहे. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
सरकारचा धाकच नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढत आहे. पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील दरोडा आणि अत्याचाराची घटना त्याचेच प्रतीक आहे. सरकारने या पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. वाघ यांनी घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
राज्यातील मंत्री पोलिस बदल्यांत ‘मलई‘ खाण्यात व्यस्त आहे.. सक्षम पोलिस अधिकारी बाजूला फेकले गेलेत.. त्याचाच परिणाम कायदा सुव्यवस्थेवर दिसतोय….गुन्हेगारी वाढलीय…
राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलिस यंत्रणा औरंगाबाद घटनेतील दरोडेखोरांना कसं पकडणार ?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
त्या म्हणाल्या, राज्यातील मंत्री पोलिस बदल्यांत ‘मलई‘ खाण्यात व्यस्त आहे. सक्षम पोलिस अधिकारी बाजूला फेकले गेलेत. त्याचाच परिणाम कायदा सुव्यवस्थेवर दिसतो. गुन्हेगारी वाढलीय. राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलिस यंत्रणा औरंगाबाद घटनेतील दरोडेखोरांना कसं पकडणार? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे


