🕒 1 min read
मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी घोटाळ्यातील कथित ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पाठवली. त्यानंतर भाजपशी संबंधित आणखी ९९ घोटाळ्यांचे पुरावे देणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले
या प्रकरणावर किरीट सोमय्या म्हणाले, ‘मला कळत नाहीये की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचं आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टता करावी’.
दरम्यान, सोमय्या यांनी या कथित भ्रष्टाचारावर भाष्य न केल्याने राऊत यांनी शायरीद्वारे सोमय्यांवर टीका केली आहे. ‘तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
तू इधर उधर कि न बात कर..
ये बता कि
काफिला क्यू लुटा!
***********************
"मला कळत नाही संजय राऊतांचे आभार मानू की आश्चर्य व्यक्त करू": किरीट सोमय्या https://t.co/qHPRxGYD0z— Sanjay Raut (@rautsanjay61) October 21, 2021
काय आहे प्रकरण?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना काल एक खळबळजनक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा, करत हा घोटाळाही उघड करा असं म्हटलं आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन संजय राऊत यांनी पत्राद्वारे केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
