Share

‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार

Published On: 

मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी घोटाळ्यातील कथित ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पाठवली. त्यानंतर भाजपशी संबंधित आणखी ९९ घोटाळ्यांचे पुरावे देणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले.

या प्रकरणावर किरीट सोमय्या म्हणाले, ‘मला कळत नाहीये की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचं आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टता करावी’.

दरम्यान, सोमय्या यांनी या कथित भ्रष्टाचारावर भाष्य न केल्याने राऊत यांनी शायरीद्वारे सोमय्यांवर टीका केली आहे. ‘तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. राऊतांनी टोला लगावल्यानंतर भाजपनेही आता पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांना शायरीच्या माध्यमातून काही प्रश्न विचारलेत. ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’ असे सवाल त्यांनी केलेत.

‘बिलकुल तू इधर उधर कि न बात कर. ये बता कि सचिन वाजे को किसने लिया।, किसानोको मदद क्यो नही दि!, शिवाजी महाराज के प्रतिमा के पास खडे होनेवाले परभणी एनसीपी विधायक पर कारवाई क्यो नही! और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’ असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना काल एक खळबळजनक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा, करत हा घोटाळाही उघड करा असं म्हटलं आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन संजय राऊत यांनी पत्राद्वारे केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!