मुंबई : ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
सुरुवातीला ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली होती. राज्य सरकारने ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी पावले उचलले होते. या मिशन बिगिन अगेन ची नियमावली ३१ जानेवारी २०२१ मध्ये देखील कायम ठेवण्यात आली आहे. अशातच अतिउत्साही नागरिकांना आवर घालण्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू केली आहे.
मुंबईकरांनी नववर्ष स्वागतासाठी बाहेर न पडत घरच्या घरीच साधं ‘सेलिब्रेशन’ करावं असं आवाहन प्रशासनातर्गे करण्यात येत आहे. अशातच, घरातल्या पार्टीसाठी ऑनलाईन फूडची ऑर्डर देणार असाल तर ती रात्री 9.30 वाजेपर्यंतच द्यावी, रात्री 9.30 वाजेपर्यंतच्या अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय आहारने घेतला असल्याचं आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगितलं आहे.
रात्रीची संचारबंदी लागू असल्याने रात्री ११ च्या आतच फूड डिलिव्हरी करावी लागणार आहे. रात्री 11 नंतरच्या नाईट कर्फ्यूत फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना प्रशासनानं अद्याप कोणतीही सूट दिली नाही. त्यामुळे हा नरिणय घेण्यात आला आहे. तर पुण्यात, मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टोरंट रात्री पावणे अकराला बंद करावेत असे आदेश जरी केले आहेत. त्यासोबतच, होम डिलेव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु ठेवावी असं देखील सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- …अन चक्क उदयनराजेंनी वासुदेवालाचं दिलं आलिंगन !
- जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!
- राऊतांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; आशिष शेलारांची जहरी टीका
- केंद्रीय मंत्र्यांनीही घेतला शेतकरी आंदोलनातील लंगरमधील भोजनाचा आस्वाद !


