Share

विरोधकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला आपण घाबरत नाही- चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई:- नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब सानप यांचे स्वागत करताना, भाजपात काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नसल्याचे म्हटले. तसेच, विरोधकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगबाबतही पाटील यांनी आपण घाबरत नसल्याचं सांगितलं.

विरोधकांच्या टीकेला आपण घाबरत नाही, सातत्याने माझ्यावर, देवेंद्र फडणवीसांवर आणि गिरीश महाजनांवर टीका करण्यात येत आहे. मात्र, आम्ही कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

विचार आणि ध्येयाने काम करणारी माणसं फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे सानप भाजपात आले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. सोबतच बाळासाहेब सानप यांच्यामध्ये राज्यात काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. एकोप्याने काम करा. कार्यकर्त्यांमध्ये दुही निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला देत भाजपमध्ये असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी न करण्याची ग्वाही देखील पाटील यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!