🕒 1 min read
मुंबई : आज (७ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी अजित पवार यांनी पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. मावळ तालुक्यातील अमोल केदारी, संस्थापक, बाळासाहेब आडकर (सरपंच ,शिवली), दिनकर आडकर (माजी पंचायत समिती सदस्य, मावळ), अरूण आडकर (शिवली, सामाजिक कार्यकर्ते) तसेच काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला.
तसेच नवी मुंबईचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सुलतान मालदार यांच्या पुढाकाराने नंदू भोपी, जिल्हाध्यक्ष, रायगड, सरपंच, भारत चौधरी, कामगार नेता, तळोजा, भानुदास म्हात्रे, उपसरपंच, नितळम तसेच इतर मान्यवरांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणारे महात्मा किरीट सोमय्या”; राऊतांचा टोला
- “पैसे योग्य ठिकाणी गुजरातला तर…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर निशाणा
- नगरसेवक वसंत मोरेंचा मनसेला रामराम? पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट!
- “२५ वर्ष मराठी माणसाच्या नावावर…”, निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा
- “…ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्या”, काँग्रेसची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
