🕒 1 min read
नवी दिल्ली: काल (८ मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिन भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मात्र यातही सर्वांत विशेष आणि चर्चेत असलेल्या शुभेच्छा ठरल्या त्या तालिबानच्या. महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी सांगू इच्छितो की, इस्लामिक नियमांनुसार महिलांना त्यांचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. ते याचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या न्याय्य गरजा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरक्षित वातावरण देण्यासाठी IEA नेहमीच वचनबद्ध आहे”, असे ट्वीट यूएनमध्ये अफगाणिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असलेले तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन (Taliban spokesman Suhail Shaheen) यांनी केले आहे.
On the occasion of International Women’s Day, I would like to say, women have all their fundamental rights as per the Islamic rules. They can avail that. The IEA is committed to providing a secure environment to deliver their legitimate needs and demands.
— Suhail Shaheen. محمد سهیل شاهین (@suhailshaheen1) March 8, 2022
दरम्यान काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उद्धवस्थ करून तालिबान्यांनी आपली सत्ता स्थापन केली. त्यात तेथील महिला आणि बालकांवर अनेक बंधने लादण्यात आली. मात्र आता महिला दिनाच्या निमिताने महिलांच्या हक्कांसाठी कटिबद्ध असल्याचे ट्वीट एकदमच चर्चेत आले आहे.

