औरंगाबाद : मागच्या काही दिवसात हिजाब प्रकरणाने देशभरात धुमाकूळ घातला होता. काहींनी या प्रकरणाचा निषेध देखील केला तर काहींनी समर्थन केले होते. आता कुठे हे प्रकरण व चर्चा थांबली गेली होती. त्यातच वंचित बहुजन आघाडीकडून मुस्कान खानचा सत्कार करण्याचे जाहीर केल्यापासून औरंगाबाद भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. व हे प्रकरण आणखी चिघळले जाणार असण्याची दाट शक्यता आहे.
मुस्कान खानचा सत्कार केला जाणार असल्याने, औरंगाबादच्या भाजप कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी त्यांनी पोलिस आयुक्तालयात पत्र दिल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भाजप समोरासमोर येण्याची शक्यता अनेक लोकांनी व्यक्त केली आहे.
सत्कार केल्यास रस्त्यावर उतरणार! संजय केनेकर
कर्नाटकातील हिजाब धारी बेबी मुस्कान खानचा वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते १४ मार्चला सत्कार होणार आहे अशी माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. सत्कार केल्यास रस्त्यावर उतरणार! असा इशारा शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला असल्याने वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तविली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –


