Share

“देवेंद्र आहेत ते भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच…”, भातखळकरांचा ट्वीट करत इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा सूचक ट्वीट करत इशाराच दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) तळपती तलवार म्हणत भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत आहेत. यावरूनच भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मविआ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

“देवेंद्र आहेत ते तळपती तलवार आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार आहेत.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधकांविरुद्ध कत्तलखाना चालवत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. सरकारमधील नेत्यांच्या इशाऱ्यावरुन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांच्या सहकार्याने भाजपच्या किमान डझनभर नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान फडणवीसांनी थेट विधानसभेतच पुरावे सादर केल्याने त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज सभागृहात सरकारच्यावतीने स्पष्टीकरण देणार का? अशा चर्चा आता रंगत आहेत. तसेच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे राजकारण अधिकच तापलेले दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!