Share

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महादेव जानकरांचा पक्ष आक्रमक 

Published On: 

🕒 1 min read

उदगीर – राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकरी मायबाप हतबल झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून माजी मंत्री महादेव जानकर यांचा पक्ष आक्रमक झाला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट एकरी ५० हजार रुपये ची नुकसान भरपाई जमा करावी आशा विविध मागण्यांसाठी आज (दि २०) मंगळवार रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.

rsp

राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. असमानी संकटाने हाती आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी या मागणीसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करत असल्याची माहिती रासप चे तालुका अध्यक्ष नागनाथ बोडके यांनी माहिती दिली.

यावेळी परमेश्वर सोमवंशी, शेषेराव केंद्रे, राम नरवडे, पांडुरंग सूरनर, मधुकर तिकटे, ऍड. लक्ष्मीकांत शिंदे, बाबुराव सुरनर, गुणवंत उदगिरे, माधव सताळे, अजिंक्य नेलवाडकर आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!