Share

कोकणाचा कॅलिफोर्निया व्हावा ही पवारसाहेबांची इच्छा – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

रायगड : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्याबाबत विचारविनिमय सुरु असतानाच दुसरीकडे कोकणासह कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये कोरोना बहितांची संख्या ही चिंताजनक आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासोबतच विकास कामांचा देखील आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची कोकणाप्रती असलेल्या आत्मीयतेच्या देखील आवर्जून उल्लेख केला आहे.

‘कोकणची ही भूमी ऐतिहासिक आहे. या भूमीला छत्रपतींचा वारसा आहे, महाडचं चवदार तळंही इथेच आहे. सी डी देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास. त्यामुळे इथे आल्याचा आनंद आहे, रायगडावर सुवर्णतुला 4 जूनला झाली, आजचा दिवस महत्वाचा आहे, ‘असं अजित पवार म्हणाले.

‘शरद पवारांनी अनेक हल्ले , वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं. कोकणाबद्दल पवार साहेबाना प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे. राज्य सरकारने निधी देण्याचं काम केलं. मुंबई गोवा महामार्गावर फॉरेस्टची अडचण आहे. काम रखडलंय, आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात साताऱ्यात एकाच दिवशी 40 किलोमिटरचा रस्ता तयार केला,’ असं अजित पवारांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!