मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते, ‘पवार कुटुंबियांनी विकासाचा मार्ग दाखवला’, त्यावर भाजपनेते अतुल भातखळकर यांनी उपाहासात्मक टोला लगावला आहे. ‘खंजीर खुपसून स्वत:चा विकास करण्याचा मार्ग … असे वाचावे’, असा टोला भातखळकरांनी लगावला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना उद्देशून हा टोला लगावल्याची चर्चा आहे.
खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग… असे वाचावे pic.twitter.com/MngnflZhNa
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
सध्या मनी लाँड्रिंग आणि १०० कोटी वसुली प्रकरणी महाविकास आघाडी आणि भाजपा नेते एकमेकांवर निशाना साधत आहेत. त्यातच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
आम्हीही अंडी
उबवली होती- मुख्यमंत्री…. अखेर मान्य केले
की ते घरकोंबडे आहेत— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, राजकारणातदेखील इन्क्युबेशन सेंटर आहे ते आम्ही पंचवीस-तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. खळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘अंडी उबवली होती’ या वक्तव्यालाही प्रतिउत्तर दिले आहे. अखेर मान्य केले की ते घरकोंबडे आहेत. असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

