Share

पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?; निलेश राणेंचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले मविआ सरकारचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिक हे थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे  निरीक्षण नोंदवले आहे. तसेच नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाने सदरील निरीक्षण नोंदवले. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासूनचा हा संशय आहे कारण मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? तेव्हा मीडिया वेगळी होती, तुम्ही वाचलात.”, असे ट्वीट करत निलेश राणे यांनी शंका व्यक्त करणारे सवाल उपस्थित केले आहेत.

दरम्यान नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी डी-गँगशी संबंध ठेवून गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच याची  दखल घेत न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले असून ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये नवाब मलिक आणि सरदार शाहवली खान यांना आरोपी ठरवले असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!