🕒 1 min read
रत्नागिरी : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
या कायद्यांचा मोठा गाजावाजा राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. मात्र, हे कायदे किती अंमलात येऊन पीडितांना न्याय मिळवून देणार यावर अनेक प्रश्न विरोधकांनी उभे केले. अशातच, चक्क महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद असे महत्वाचे पद असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्याविरोधात विनयभंगाचा व बळजबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, चौकशी व तपासाच्या नावाखाली अद्याप पोलिसांनी अटक देखील केलेली नाही.
यावरून भाजप आता आक्रमक होत असून शेख यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर राजकीय सूडबुद्धीने हे आरोप होत असल्याचे सांगतानाच त्यांना रडू देखील कोसळले. दरम्यान, यासंदर्भात भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
‘राष्ट्रवादीसाठी नवीन प्रकारची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.. आरोपीवर गुन्हा नोंदवला गेला असून सुद्धा, ‘तो मी नाही’ ऐकून पोलीस गप्प बसले. मी पीडित मुलीला ओळखतच नाही सांगणाऱ्याची १ वर्ष जुनी ओळख पोलिसांनीच बाहेर काढली तरी आरोपी मोकाट आहे. न्याय देणार का पीडित मुलीला पवार साहेब?? ‘ असा सवाल त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीसाठी नवीन प्रकारची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.. आरोपीवर गुन्हा नोंदवला गेला असून सुद्धा, ‘तो मी नाही’ ऐकून पोलीस गप्प बसले. मी पीडित मुलीला ओळखतच नाही सांगणार्याची १ वर्ष जुनी ओळख पोलिसांनीच बाहेर काढली तरी आरोपी मोकाट आहे. न्याय देणार का पीडित मुलीला पवार साहेब??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 31, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव केले नाही, परंतु ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब केले’
- ‘संभाजीनगर’वरून शिवसेनेची कोंडी; इतिहास बदलू शकत नाही म्हणत काँग्रेसचा नामकरणाला विरोध !
- ‘तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला तर पुढील पगार शेतकऱ्यांना देणार’
- शिवसेनेच्या ‘त्या’ वादग्रस्त कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख?
- डिसेंबर अगोदरच भारतात आला असू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन – एम्स संचालक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
