Share

‘औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव केले नाही, परंतु ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब केले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेने महाविकास आघाडी बनवून सत्ता स्थापन केल्यापासूनची बदलती भूमिका आणि हिंदुत्वाची कास यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाचा भगवा शुद्ध यावरून देखील या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं.

वैचारिक साम्य असलेल्या या दोन मित्र पक्षांची मैत्री वर्षभरापूर्वी संपुष्टात आल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे. अशातच, शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने नामकरणाला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

अशातच, शिवसेनेच्या उर्दू भाषेतील दिनदर्शिकेचा फोटो सद्या व्हायरल होत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखलं जातं. मात्र, या दिनदर्शिकेत त्यांचा उल्लेख ‘जनाब’ असा केला असल्याचे दिसून येत आहे. यानंतर, भाजप नेत्यांनी यावरून शिवसेनेवर घणाघात केला आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ‘औरंगाबादचे संभाजीनगर करणे झेपले नाही, उस्मानाबादचे धाराशिव करणे जमले नाही… परंतु ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असे नामकरण मात्र यशस्वीपणे केले… कात टाकणाऱ्या शिवसेनेचे मनापासून अभिनंदन…’ अशी जहरी टीका भातखळकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!