Share

शिवसेनेच्या ‘त्या’ वादग्रस्त कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेने महाविकास आघाडी बनवून सत्ता स्थापन केल्यापासूनची बदलती भूमिका आणि हिंदुत्वाची कास यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाचा भगवा शुद्ध यावरून देखील या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं.

तर, मंदिरांसह सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरचं काही प्रश्न निर्माण केल्यानंतर हा वाद अधिक पेटला होता. याचदरम्यान, मुंबईत मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अजान पठण स्पर्धेचं आयोजन शिवसेनेच्या एका नेत्याने केली होती.

यावर देखील भाजपने शिवसेनेवर सडकून टीका केल्याचं दिसून आलं होतं. वैचारिक साम्य असलेल्या या दोन मित्र पक्षांची मैत्री वर्षभरापूर्वी संपुष्टात आल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे. आता, शिवसेनेचं ‘शिवशाही’ हे उर्दू भाषेतील कॅलेंडर वादग्रस्त ठरत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखलं जातं. मात्र, या दिनदर्शिकेत त्यांचा उल्लेख ‘जनाब’ असा केला असल्याचे दिसून येत आहे.

अशातच, शिवसेनेच्या या दिनदर्शिकेत आणखी एक मोठी चूक झाल्याचं निष्पन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तारखेला यामध्ये फक्त ‘शिवाजी जयंती’ असं दर्शवण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

‘शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही.’ असा आक्रमक इशाराच भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!