🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.
अशातच, औरंगाबादमध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा फलक शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. या फलकामुळे चर्चांना नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. तर, याआधी खासदार देखील शिवसेनेचेचं होते. राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेकडे आहे.
त्यामुळे, नामकरणाचं राजकारण सोडून हिंमत असेल तर सत्ताधाऱ्यांनी संभाजीनगर नामकरणाचा अध्यादेश काढावा असं खुलं आव्हान मनसेतर्फे देण्यात आलं आहे. आता, शिवसेनेने यासंदर्भात हालचाली सुरु केल्याचं दिसून येत आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आहे.
या संदर्भात काँग्रेसची असलेली भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. काँग्रेसला नामकरण मान्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. ‘या प्रस्तावाबद्दल मला माहिती नाही. महाविकास आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर करण्यात आली आहे. सामान्य माणसाला केंद्रीभूत करून सरावानं सोबत घ्यायचं, त्यांना सुखी करायचं हा आमचा किमान सामान कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.’ असं ते म्हणाले.
तर, ‘विकासावर आम्ही केंद्रित आहोत. नावं बदलणं हा विषय नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा अजेंडा म्हणून नामकरण आम्हाला मान्य नाही. काँग्रेस विकासाची वाटचाल करणारी आहे. नाव बदलावर आमचा विश्वास नाही. नाव बदलून काही होत नाही. इतिहास बदलू शकत नाही.’ अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रयेतून मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! ‘थर्टी फर्स्ट’च्या सोयीसाठी मुंबई महापालिकेचा महत्वाचा निर्णय
- “जनाब बाळासाहेब ठाकरे” ! शिवसेनेच्या ‘शिवशाही’ कॅलेंडरमध्ये बाळासाहेबांचा ‘जनाब’ असा उल्लेख
- #औरंगाबाद : FIR सार्वजनिक करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार? चित्रा वाघ यांचा परखड सवाल
- पाकिस्तानी महिला झाली होती चक्क भारतात सरपंच !
- ‘हा’ खुल्यावर्गावर अन्याय; अनेकदा अपयशी झालेले अधिकारी प्रशासन कसं हाताळणार? आनंद दवेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
