सांगली : दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसी संबंधी यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की केंद्राने महत्त्वाचे पाऊल टाकले मात्र ही केंद्राने शुद्ध फसवणूक केली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांना भाजप आणि मित्रपक्षांकडून प्रत्युत्तर देण्यात येत असून मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न मिळण्याचा शरद पवार हेच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पवारांवर खोचक टीका केली आहे.
‘शरद पवार साहेब तुम्ही कधी तरी खरे बोलणार आहात का?, तुमची सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे?’ असे सवाल करत सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शरद पवार तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही कधीतरी खरे बोलणार आहात का? अजून किती वर्षे समाजा-समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करणार आहात ?,’ अशी खोचक टीका खोत यांनी केली आहे.
‘ १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकारी राहिलेला नाही, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला गेला. मात्र आता जर घटना दुरुस्ती करून राज्याला अधिकार मिळाला असेल, तर मग तुम्ही आता परत केंद्र सरकारला कसा काय दोष देता?’ अशी विचारणा देखील त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसह शरद पवार यांना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लसींचा मुबलक पुरवठा करण्यासाठी सीरमने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदीर उघडण्यासाठी पुजाऱ्यांसह व्यापारी आक्रमक
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक


