Share

‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. यामुळे पोलीस आणि पडळकर यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास सुरुवात झाली असून जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच असा निर्धार पडळकरांनी केला आहे.

शर्यतीचे आयोजन रोखण्यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु झाली आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना पोलीस विभागाकडून नोटीसा देखील देण्यात आल्या आहेत. यामुळे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील अधिक आक्रमक झाले आहेत.

‘मला जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचं गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. आमच्या शेतकऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. मी बैलगाडा शर्यत भरवणारच,’ अशी भूमिका पडळकर यांनी घेतली आहे. या शर्यतीकडे राज्याचं लक्ष्य लागलं असून हा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘बैलगाडा शर्यतीला शेतकरी येणार आहेत, तालिबानी नव्हे’

शर्यतीला बंदी असल्याने आजपासूनच जिल्ह्यात पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. यावर पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ‘गोवंशाची शान आणि शेतकऱ्यांची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचे काम हे राष्ट्रवादीकडून होत आहे. राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानहून कोणीही तालिबान येणार नाहीत.’ असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!