उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू करण्यासाठी तुळजापूर येथील पुजारी व व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण केले. ‘दार उघड बये आता दार उघड , आई राजा उदो उदो’ अशी घोषणाबाजी करीत पुजारी व्यापारी यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वच सार्वजनिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता कुठे निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र अद्यापही सर्व खुलं केले असताना मंदिरांना अद्याप टाळेच आहे. यामुळे मंदीराबाहेर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंदिर बंद असल्याने पुजारी, व्यापारी यांची उपासमार होत असून अर्थकारण ठप्प झाले आहे. राज्यातील सर्व व्यवहार खुले, रेल्वे , बस,मॉल दारूचे बार सुरू आहेत तरीही मंदिर धार्मिक स्थळे बंद का ? असा सवाल सरकारला पुजारी व व्यापाऱ्यांनी विचारला.
तीर्थक्षेत्र तुळजापूरातील अर्थकारण सुरळीत होण्यासाठी तातडीने तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे. यासाठी पुजारी मंडळाच्या वतीने मंदिर कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आले. या उपोषणात पुजारी बांधवासोबतच व्यावसायिक, नागरिक सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परळीतील त्या अंगार, भंगारवाल्या घोषणा मी ऐकल्याच नाहीत’, मंत्री भागवत कराडांची प्रतिक्रिया
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

