मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजप-शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार वकील आशिष शेलार यांनी, ‘मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या १३२ अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातल्या बदल्यांप्रमाणेच आता महापालिकेतही वसुली केली जात आहे का?,’ असा सवाल शिवसेनेला केला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करून हा सवाल उपस्थित केला असून, ‘मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह इतर आरक्षणांच्या रिक्त जागांवर महापालिकेत सेवेत असलेल्या १३२ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला, परंतु ४ सर्वसाधारण सभानंतरही सत्ताधारी शिवसेनेने, या प्रस्तावाच्या मंजुरीला विलंब केल्याने, हा उशीर का करण्यात येतोय?, असाही सवाल त्यानी विचारला आहे.
शिवसेनेने महापालिकेत 132 मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव रोखून का धरलाय? मराठीच्या तथाकथित रखवालदारांनी मराठी अधिकाऱ्यांवर केलेला हा अन्याय आणि त्या मागे सुरु असलेला घोटाळा आम्ही मुंबईकरांसमोर उघडा करु! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Mumbai @MPLodha pic.twitter.com/UNjxW8Ef5T
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2021
चिटणीस पदावर शुभांगी ‘सावंत’ यांना डावलून संगिता ‘शर्मा’ यांना बढती देण्यात आली आहे. आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक करण्यात आली आहे. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे ?, मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी तर पहिल्यापासूनच म्हणतोय की चिक्की घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करा’, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होणे अशक्य’, सिरमच्या सायरस पूनावालांचे मोठे वक्तव्य


