मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या छळाचा पाढाच वाचला आहे.
मी सीबीआयकडे माझ्या पतीचे कॉल रेकॉर्ड, व्हॉट्स अॅप चॅट याची सर्व माहिती देणार आहे. आज २५ वर्षानंतर माझ्यासोबत अशा प्रकारचं कृत्य केलं जातय. माझ्या मुलांना बंद करुन ठेवलं गेलं. राक्षस, नीच सारखी लोक देखील असं कोणाशी वागणार नाहीत, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांच्या विरोधातही काय षड़यंत्र आखलं जात आहे? हेही मी माध्यमांसमोर मांडणार आहे. माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस. मी तिचं ऐकलं नाही म्हणून भोगत आहे, असं सांगत करुणा मुंडे या धनंजय मुंडेंवर आक्रमक झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सायरा बानू यांचा एंजिओग्राफीस करण्यास नकार\
- ‘काका संजय गांधींनी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर ‘तो’ अपघात झाला नसता’, राहुल गांधींचा खुलासा
- चार वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणामुळे रकुल प्रीतची आज ईडीकडून चौकशी
- ‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा
- पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेच काम भाजपकडून सुरू आहे – राष्ट्रवादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

