🕒 1 min read
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी तब्बल ७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या २१ जागासाठी आता एकूण १४३ उमेदवार रिगंणात उतरले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकीच्या रिगंणात खासदार चिखलीकर व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यात चांगलीच रणधुमाळी रंगली होती. खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहे. मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या गोटाने त्यांना यावेळी चिखलीकरांना जिल्हा निवडणुकीपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने चिखलीकर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २३ मार्च पर्यंतची मुदत आहे. एकूण १४३ उमेदवारापैकी किती उमेदवार आपला अर्ज मागे घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यादरम्यान विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अनेकजण मनधरणी करण्यात येईल. जिल्हा बँकेसाठी २ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी ही ४ एप्रिल रोजी पार पडेल.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र पालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; प्रशासकांचा कार्यकाळ आता बेमुदत
- पंतच्या फलंदाजीवर इंग्लिश खेळाडू फिदा ; फ्लिंटॉफ म्हणाला, WOW
- संशय अधिकच बळावला : मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टमच्या ठिकाणी सचिन वाझे का उपस्थित होते ?
- सरकारचा मोठा निर्णय; अपघात सुरक्षेसाठी कारमध्ये ‘हे’ तंत्रज्ञान बंधनकारक
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या निकषात बदल करण्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा – दादा भुसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
