Share

मनसुख हिरेन प्रकरण : जेवढ्या लवकर सत्य बाहेर येईल तेवढं सरकारच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल

Published On: 

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली व धमकीपत्र असलेली कार आढळल्याने खळबळ उडाली असतानाच शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दरम्यान,महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेसंबंधी शंकेला अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं आहे.

दरम्यान,खा.संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी हिरेन मृत्यूप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. विरोधकांनी मुद्देसुद माहिती दिली तर त्याचा तपास व्हायलाच हवा. नक्कीच व्हावा. ही घटना दुर्देवी आहे. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचं कुणीही भांडवल करू नये.

हिरेन यांचा मृत्यू का झाला? कोणत्या कारणाने झाला? त्याला कोण जबाबदार आहेत? या सर्व प्रश्नांशी संबंधित सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवं. जेवढ्या लवकर सत्य बाहेर येईल तेवढं सरकारच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल. राज्याचं अधिवेशन सुरू असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणातील साक्षीदाराचा संशायस्पदपणे मृत्यू होणे हे नक्कीच धक्कादायक आहे असंही ते म्हणाले.

एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही.मुंबई पोलीस हा तपास करण्यात सक्षम आहे. आता तर गृहमंत्र्यांनी एटीएसकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे, त्यामुळे विरोधकांनी लगेचच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!