Share

एनआयएकडे तपास दिल्यानेच हिरेन प्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही, मुंबई पोलीस सक्षम – संजय राऊत

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली व धमकीपत्र असलेली कार आढळल्याने खळबळ उडाली असतानाच शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेसंबंधी शंकेला अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं आहे.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा एनआयएद्वारे तपास करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटकारले आहे. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची विरोधक मागणी करत आहेत. एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही, असं सांगतानाच मुंबई पोलीस हा तपास करण्यात सक्षम आहे. आता तर गृहमंत्र्यांनी एटीएसकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांनी हिरेन मृत्यूप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. विरोधकांनी मुद्देसुद माहिती दिली तर त्याचा तपास व्हायलाच हवा. नक्कीच व्हावा. ही घटना दुर्देवी आहे. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचं कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!