औरंगाबाद : रेल्वेला कमी प्रवाशी संख्या असल्याने काही रेल्वे गाड्या सोमवार (दि.७) पासून रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. आजपासून औरंगाबाद शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरु होत आहे. औरंगाबाद विभागातून ८० हून अधिक रेल्वे धावत आहेत. मात्र सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतरही काही रेल्वे प्रवाशांअभावी आजपासून रद्द होत आहे. प्रवाशांना पॅसेंजर रेल्वे सुरु होण्याची प्रतिक्षा कायम आहे.
रेल्वे विभागाच्या वतीने औरंगाबाद-नांदेड ही रेल्वे ७ जून ते १४ जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच नांदेड – औरंगाबाद ही रेल्वे ४ जून ते ११ जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच आदिलाबाद- नांदेड ही रेल्वे १ जून तर १५ जुन दरम्यान रद्द करण्यात आली. तसेच नांदेड – आदिलाबाद ही रेल्वे १ जून ते १५ जून तर सिकंदराबाद- श्री साईनगर शिर्डी ही रेल्वे ४ जून ते १३ जून दरम्यान रद्द करण्यात आली.
याशिवाय श्रीसाई नगर शिर्डी ते सिकंदराबाद ही रेल्वे ५ जून ते १४ जुन या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद-रेणीगुंठा ही रेल्वे ४ जून ते ११ जून दरम्यान रद्द करण्यात आली. याशिवाय रेणीगुंठा-औरंगाबाद ही रेल्वे ५ ते १२ जून या दिवशी रद्द करण्यात आली आहे. तसेच परभणी- नांदेड ही रेल्वे ३ ते १७ जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड -तांदूर ही रेल्वे १ जून ते १५ जून दरम्यान सिकंदराबाद ते तांदूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच तांदूर-परभणी ही रेल्वे २ जून ते १६ जून दरम्यान तांदूर ते सिकंदराबाद आणि नांदेड ते परभणी दरम्यान रद्द करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांवर राग नाहीच, दगाबाज तर शिवसेना ; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- बारावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय प्रशासनासमोर पेच, आता प्रतिक्षा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची!
- परराज्यातून कारमध्ये गांजाची वाहतूक करणारे दोघे गुन्हेशाखेच्या जाळ्यात, ३७ किलो गांजासह १२ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त
- ‘आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा’
- ‘वेळीच अक्कल आली असती तर गोंधळ टाळता आला असता’; जयंत पाटलांचा मोदींवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

