मुंबई : राज्यात कोरोनाचे सावट गेल्या दीड वर्षापासून आहे. पहिली लाट, दुसरी लाट आणि आता तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञाकडून वर्तवली जात आहे. कोरोना टाळण्यासाठी त्रिसुत्रांचा वापर करण्यास सागितले आहे. मास्क वापरणे, हात धुणे आणि शारिरिक अंतर पाळणे व लसीकरण सुद्धा यातीलच एक महत्वाचा घटक आहे. मात्र, सध्या नागरिक हे नियम पाळण्यास कुचराई करत आहे. नको त्या ठिकाणी गर्दी करत आहेत. मास्क वापरण्यास कुचराई करताना दिसून येत आहे आणि काही नागरिक लसीकरण करण्यास देखील टाळाटाळ करत आहे.
यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पक्षांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते पक्षी जणू शारिरिक अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पाळताना दिसतात. त्यावर आव्हाड म्हणालेत की, ‘पक्षांना शारिरिक अंतर ठेवणे समजले. मात्र, माणसांना कधी कळणार?; अशा प्रकारे त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
Social Distancing well understood by birds … when will human beings understand pic.twitter.com/7cI40guvvH
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 16, 2021
दरम्यान, जो पर्यंत कोरोना नियमांचे पालन होणार नाही तो पर्यानात हा जीव घेणा आजार थांबणार नाही. असे असेले तरीही नियमांचे काटेकोर पालन होताना कुठेही दिसले नाही, अगदी राजकीय नेत्यांनी देखील कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत राजकीय कार्यक्रम, उद्घाटन साम्रंभ एवढाच नाही तर लग्न समारंभ देखील मोढ्या उत्साहात साजरे केले. मात्र, कोरोनाला हरवायचे असेल तर हे नियम पाळावेच लागतील हे मात्र नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपुरात संचारबंदी! चारशे वारकऱ्यांसाठी तीन हजार पोलीस तैनात
- शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचे राजकीय फलित काय?
- पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार, नितीन गडकरींनी दिली माहिती
- ‘मूठभर उद्योजकांची सौरऊर्जा प्रकल्पावर मक्तेदारी’, आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा
- व्यवस्थेला जेरीस आणू, पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही-विजय वडेट्टीवार


