Share

पंढरपुरात संचारबंदी! चारशे वारकऱ्यांसाठी तीन हजार पोलीस तैनात

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुख्माई यांच्या भेटीसाठी वारकरी पंढरपुरात आषाडी एकादशीला मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात पण कोरोनामुळे आषाढी एकादशीची वारी वारकऱ्यांसाठी अडचणीत सापडली आहे. पंढरपूरसह परिसरातील १० गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. आज अनेक विठ्ठल भक्तांनी नामदेव पायरी येथे येऊन दर्शनासाठी गर्दी केली आहे. या आषाढीला दर्शन व्हावे यासाठी हे भाविक नामदेव पायरीचे आणि कळसाचे बाहेरून दर्शन घेऊन परतत आहेत.

उद्यापासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत एसटी आणि खाजगी बससेवा पूर्णपणे बंद असणार असून शहरात केवळ दूध, औषधे आणि पेट्रोल, गॅस एवढीच सेवा सुरु राहणार असल्याने नागरिकांनीही खरेदीसाठी गर्दी केली आहे. उद्या १८ जुलै ते २५ जुलैपर्यंत पंढरपूर शहरात संचारबंदी असणार असून गोपाळपूर येथील संचारबंदी २४ तारखेला आणि इतर ९ गावातील संचारबंदी २२ तारखेला संपणार आहे.

पंढरपुरात वारकऱ्यांच्या फक्त दहा मानाच्या पालखी सोहळ्यातील चारशे वारकऱ्यांना पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रवेश भेटणार आहे. बाकीच्या कोणत्याही वारकऱ्यांनी प्रवेश करू नये यासाठी तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांना यात्रा काळात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांना कोरोना किट देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!