नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला.
विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.
राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. कृषि विषयक विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडून यांनी नाराजी व्यक्त करत या घटनेची निंदा केली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे.
महत्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेले, अशोक चव्हाण पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
- मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आज राज्यातील पहिला जिल्हा बंद, सरकारचं घालणार श्राद्ध
- मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन, मनसेसैनिकांनी लोकलने प्रवास केलाच…
- कृषी विधेयकाविरोधात शेतकरी उतरणार रस्त्यावर, २५ तारखेला देशव्यापी आंदोलनाची हाक
- भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती


