सोलापूर : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून आता यावर महाराष्ट्रात राजकारण प्रचंड तापलेलं आहे. मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गही आंदोलकांनी रोखला आहे.
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आंदोलन करत राज्य सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज बारावा दिवस आहे. सकल मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आंदोलन न करण्याबाबत पोलीसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन, मनसेसैनिकांनी लोकलने प्रवास केलाच…
- कृषी विधेयकाविरोधात शेतकरी उतरणार रस्त्यावर, २५ तारखेला देशव्यापी आंदोलनाची हाक
- भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती
- थरारक! ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणास जिगरबाज तरुणांनी वाचवले! नक्की वाचा ‘हे’ वृत्त
- ‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला सळो कि पळो करू’, ओबीसी नेते प्रकाश शेडगे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

