पुणे : केंद्र शासनाचे कृषी विधेयक राज्यसभेत प्रचंड गदारोळात बहुमताने मंजूर करण्यात आले आहे; पण हे विधेयक शेती, माती व शेतकरीद्रोही आहे. संसदेत भाजपचे बहुमत असले तरी, देशभरात रस्त्यावर शेतकऱ्यांचेच बहुमत आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा देशभरातील शेतकरी धिक्कार करीत आहेत. किसान सभा व 208 शेतकरी संघटनांचा देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या कायद्याच्या विरोधात शुक्रवारी (दि. 25) देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर, शेतकऱ्यांना हमी भाव नाकारणारी, बाजार समित्या उद्ध्वस्त करण्यास कारण ठरणारी, सरकारची जबाबदाऱ्यांमधून मुक्तता करणारी व शेती आणि शेतकऱ्यांना बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या, व्यापारी, दलाल, निर्यातदारांच्या दावणीला बांधणारी विधेयके मंजूर करण्याची प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्र सरकारची ही कृती अत्यंत शेतकरी विरोधी आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दांत धिक्कार करीत आहोत.
केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर केली आहेत. आज केंद्र सरकारचा विजय झालेला असला तरी शेतकऱयांचा पराजय झाला आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात येत्या 25 तारखेला देशभर आंदोलन सुरू होईल. त्यानंतर सरकारला माघार घ्यावीच लागेल, असे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती
- थरारक! ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणास जिगरबाज तरुणांनी वाचवले! नक्की वाचा ‘हे’ वृत्त
- ‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला सळो कि पळो करू’, ओबीसी नेते प्रकाश शेडगे आक्रमक
- पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उदघाटन
- द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांची नावे जाहीर करा, अटक करा – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

