Share

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती

Published On: 

भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जखमींना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून काही लोक दगवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील टीडीआरएफ तसेच एनडीआरएफचे जवान मदत कार्यात गुंतले आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुमारे तीस वर्षे जुनी जीलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करुन या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. दुर्घटनेत इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे गाडले गेले आहेत. अग्निशमन दल आणि ठाण्यातील टीडीआरएफ तसेच एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्या खालून 12 जणांना बाहेर काढले असून त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!