मुंबई : लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेनं सविनय आंदोलन पुकारले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांची परवानगी नसताना लोकलने प्रवास करून आंदोलन केले आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेने केली होती.
दरम्यान, मनसेनं आज सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, तरीही पोलिसांच्या हातावर तुरी देत संदीप देशपांडे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकल गाठलीच. संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी गनिमी कावा करत लोकलमध्ये प्रवेश करून प्रवास केला.
महत्वाच्या बातम्या
- कृषी विधेयकाविरोधात शेतकरी उतरणार रस्त्यावर, २५ तारखेला देशव्यापी आंदोलनाची हाक
- भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती
- थरारक! ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणास जिगरबाज तरुणांनी वाचवले! नक्की वाचा ‘हे’ वृत्त
- ‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला सळो कि पळो करू’, ओबीसी नेते प्रकाश शेडगे आक्रमक
- पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उदघाटन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

