Share

“पत्रकारांवर खटले दाखल करून, त्यांना अटक करणाऱ्या सूडबुद्धी ठाकरे सरकारचे डोके ठिकाणावर येवो”

Published On: 

मुंबई : आजचा दिवस सर्वत्र ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर(Balshastri Jambhekar) यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र सुरु केले. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तराहून पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आहे.

याला अनुसरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा देत ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’दर्पण या पाक्षिकाद्वारे मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी सर्व मराठी पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.’ तसेच पत्रकारांवर खटले दाखल करणाऱ्या, त्यांना अटक करणाऱ्या सूडबुद्धी ठाकरे सरकारचे डोके ठिकाणावर येवो ही सदिच्छा, असे म्हणत भातखळकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला होता. त्यावेळी हा अंक मराठी तसेच इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रकाशित केला जायचा. एक इंग्रजी आणि एक मराठी असे दोन स्तंभ या वृत्तपत्रात असत. मराठी जनतेला देशात काय सुरु आहे हे समजावे म्हणून एक स्तंभ मराठीत लिहिण्यात येत असत. तर वृत्तपत्रात काय लिहिलंय हे ब्रिटिशांना समजावे म्हणून दुसरा स्तंभ इंग्रजीत लिहला जायचा.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!