औरंगाबाद – येथील घाटी रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात 45 बाळांची व्यवस्था आहे. मात्र, या विभागात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन मार्गच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी 11 जिल्ह्यांतील शिशूंना उपचारासाठी दाखल केले जाते. शुक्रवारी रात्री भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने 10 शिशूंचा मृत्यू झाला. त्यानंतर घाटीतील पाहणी केली असता ही बाब उघडकीस आली.
औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे टर्शरी केअर सेंटर आहे. येथे अति गंभीर रुग्णांवर उपचार आणि मातांची प्रसूती केली जाते. वेळेपूर्वी जन्माला येणाऱ्या बाळांना वॉर्मरची आवश्यकता असते. घाटीत 2009 मध्ये नवजात शिशू विभाग सुरू करण्यात आला. त्यामुळे नवजात शिशूंना याठिकाणी उपचार मिळणे शक्य झाले. सुरुवातीला 30 बेड असलेल्या विभागात आता 45 बेड आहेत. शिशूंनवरील उपचारासाठी यंत्रणा, डॉक्टर्स, आणि परिचारिका आहेत. मात्र, आग लागल्यास करायच्या उपाययोजना नाहीत. बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग देखील नाही.
बाहेर जायचे कोठून?
घाटी नवजात शिशू विभागात जाण्यासाठी आलेल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक रस्ता आहे. तो आपत्कालीन मार्ग असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात हा मार्ग आपत्कालीन नाही. ज्या बाजूने आत प्रवेश दिला जातो, त्याच्या विरुद्ध बाजूला संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असावा. प्रशासनाने सांगितलेला तो मार्ग अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. लोखंडी दरवाजावर गंज चढला आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास हा दरवाजा तत्काळ उघडता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात; वाय दर्जा ऐवजी मिळणार ‘ही’ सुरक्षा
- राज्य एकदम सुरक्षित आहे म्हणून सुरक्षा काढली; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला टोला
- हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते – उद्धव ठाकरे
- हॉटेल ताजमधून गोळीबारासारखा आवाज येतोय, फोर्स पाठवा…
- 25 जानेवारी पर्यंत ‘पॉकेट्स वॉलेटद्वारे’ गॅस सिलेंडर बुक करा आणि मिळावा कॅशबॅक !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

