नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. मात्र या दरवाढी दरम्यान तुम्हाला एक दिलासा देणारी ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये तुम्हाला आता आपण 14.2 किलो गॅस सिलेंडर बुक केल्यास. 694 रुपये ऐवजी ६४४ च रुपये द्यावे लागणार आहेत.
कारण; आयसीआयसीआय बँकेद्वारे संचालित पॉकेट्स वॉलेटद्वारे गॅस सिलेंडर बुक केल्यास गॅस सिलेंडरवर 50 रुपये निश्चित कॅशबॅक देण्यात येणार आहे. जे ग्राहक जानेवारीत पहिल्यांदाच पॉकेट्स अ;ॅपद्वारे गॅस बुकिंग किंवा बिल पेमेंट करतील. कॅशबॅक मिळविण्यासाठी, आपल्याला PMRJAN2021 प्रोमो कोड एंटर करावा लागेल. हे 10 टक्के जास्तीत जास्त 50 रुपये कॅशबॅक देते. पॉकेट्सनुसार, ही ऑफर 25 जानेवारी 2021 पर्यंत वैध आहे. हा प्रोमो कोड एका महिन्यात 3 वेळा वापरला जाऊ शकतो.
यावरून गॅस सिलेंडर बुक करताना आपल्याला आपले Pockets वॉलेट अ;ॅप उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Pay Bills वर क्लिक करावे लागेल. यानंतर, Choose Billers मध्ये More चा पर्याय दिसेल, ज्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल. यानंतर, LPG पर्याय तुमच्यासमोर येईल. येथे आपल्याला आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडर निवडावा लागेल. यानंतर, आपल्याला कन्झ्युमर आयडी, डिस्ट्रीब्यूटर आयडी आणि मोबाइल नंबर एंटर करावा लागेल. यानंतर, PMRJAN2021 प्रोमो कोड एंटर करावा लागेल. आता तुमच्या बुकिंग अमाउंटची माहिती सिस्टीमद्वारे देण्यात येईल. यानंतर तुम्हाला बुकिंग अमाउंट भरावी लागेल. व्यवहाराच्या 10 दिवसांत तुमच्या पॉकेट्स वॉलेटवर जास्तीत जास्त 50 रुपयांचे कॅशबॅक जमा केले जाईल.
महत्वाच्या बातम्या
- सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल,कॉंग्रेस नेत्याचे सोनिया गांधींना पत्र
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
खुशखबर ! जिओच्या ग्राहकांना मिळणार फक्त ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा
‘ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे; त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार’
- माझी सुरक्षा कमी करा; शरद पवारांचा अनिल देशमुखांना फोन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

