🕒 1 min read
परभणी : शिवसेनेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्यावर जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील काळे कुटुंबीयांनी हा आरोप केला आहे. रामप्रसाद काळे यांच्याकडून खासदार जाधव यांनी काळे कुटुंबीयांची संमती न घेताच जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत काळे कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. विशेष म्हणजे, या जमीन खरेदीविरोधात काळे यांच्या दोन मुलींनी आईवडील आणि खासदार जाधव यांच्या पत्नीविरुद्ध कोर्टात दाद मागितली आहे. याप्रकरणी खासदार बंडू जाधव यांनी मात्र आपण कायद्यानुसारच जमीन खरेदी केल्याचे सांगितले असून सर्व आरोप फेटाळले आहेत.
ज्यांची जमीन खासदारांनी खरेदी केली आहे ते रामप्रसाद काळे हे परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे मूळ गाव पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर आहे. रामप्रसाद काळे यांना दोन मुली व स्वप्नील नावाचा एकुलता एक मुलगा होता. स्वप्नील काळेचे यकृताच्या आजाराने दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
दिवंगत स्वप्नील काळे हे खासदार संजय जाधव यांचे कट्टर कार्यकर्ते होते. स्वप्नील यांच्या मृत्यूनंतर रामप्रसाद काळे यांनी आपल्या एकूण 18 एकर शेतजमिनीपैकी 3 एकर 35 गुंठे जमीन या वर्षी ऑक्टोबर महिन्यात खासदार जाधव यांना 44 लाख 53 हजार रुपयांना विकली. परंतु आता हा व्यवहारच मान्य नसल्याचा आरोप काळे यांच्या कुटुंबीयांनी केला असून यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. खासदार जाधव यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना खासदार संजय जाधव म्हणाले- ‘…हे तर आमदार बाबाजानी दुर्रानींचे षडयंत्र!’
- धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप
- उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी
- आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
