🕒 1 min read
परभणी : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीला नेला जात असल्याची माहिती मिळाल्यावर परभणी पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत तो पकडला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जंयत मीना यांच्या विशेष पथकाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरून 57 पोती गहू वाहनासह शुक्रवारी जप्त केला.
एका पिकअपमधून पूर्णेहून परभणीमध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसमत रोडवर गहू घेऊन जाणाऱ्या वाहनाला (MH 26, H 1986) ताब्यात घेतले. तपासानंतर वाहनात 57 पोती गहू आढळला. यानंतर वाहनचालक व धान्य ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी वाहनचालकाने मालकाच्या सांगण्यावरून हा गहू नेत असल्याचे सांगितले.
वाहनातील गव्हासंबंधी कोणतीही कागदपत्रे चालकाकडे नसल्याने संशय बळावला आहे. यामुळे अधिक तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. या पथकात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस, फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, विष्णू भिसे, अझहर पटेल, अरुण कांबळे आदींचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस रक्ताने शेती करतंय, भाजप नव्हे; राज्यसभेत कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल
- 100 हून जास्त तरुण बेपत्ता, एन्काउंटर केलं का?, संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल
- सचिनचा भारतरत्न परत घ्या, संभाजी ब्रिगेडची मागणी
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
