नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे मागच्या अडीच महिन्यांपासून रणकंदन सुरू आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, शेतकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत, ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी चांगले नाही. लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान केल्यामुळे पंतप्रधान दुःखी आहेत. देशही दुःखी आहे, पण दीप सिद्धू कोणाचा माणूस आहे ज्याने तिरंग्याचा अपमान केला? सरकार असे का म्हणत नाही, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही दीप सिद्धूला अजून का पकडले नाही? असेही त्यांनी यावेळी विचारले.
100 हून जास्त तरुण बेपत्ता
राज्यसभेत संजय राऊत म्हणाले, देशद्रोहाच्या आरोपाखाली तुम्ही तिहार तुरुंगात 200 शेतकऱ्यांना बंद केले, दुसरीकडे या आंदोलनातील तब्बल 100 हून अधिक तरुण बेपत्ता आहेत, पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले काय? काही कळायला मार्ग नाही. हे सर्व गद्दार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. बहुमत अहंकाराने चालत नाही, असेही ते म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, शेतकरी आता दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्ली सीमेवर आहेत. तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकत नाही, त्यांना देशद्रोही म्हणता. ज्या लोकांसाठी तुम्ही खिळे ठोकले, लोखंडी बॅरिकेड्स लावले, त्याऐवजी लडाख सीमेवर ठेवले असते तर चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला नसता. आपल्या हक्कांसाठी लढले म्हणून ते खलिस्तानी, म्हणून ते देशद्रोही, हा कुठला न्याय आहे? असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस रक्ताने शेती करतंय, भाजप नव्हे; राज्यसभेत कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल
- सचिनचा भारतरत्न परत घ्या, संभाजी ब्रिगेडची मागणी
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’


