मुंबई : कोरोना विषाणूशी लढाई करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 17 FIR नोंदवून 15 जणांना अटक केली होती. या पोस्टरमध्ये असं म्हटलं होतं की, ‘मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश मे क्यों भेज दिया?’. आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला होता.
मात्र, या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर हे पोस्टरच शेअर केलं आहे. त्यात या दोघांनी मलाही अटक करा, असं म्हटलं आहे. तसेच मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली? असं हिंदीत लिहिलेलं हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून नेटकरी हे पोस्टर व्हॉट्सअॅपवर डीपी म्हणून ठेवण्यास एकमेकांना सांगत आहेत. तसेच कॉंग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर ठेवले आहे.
Arrest me too.
मुझे भी गिरफ़्तार करो। pic.twitter.com/eZWp2NYysZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
दरम्यान, कालच्या या प्रकरणी पोलिसांच्या माहितीनुसार ईशान्य दिल्लीत तीन एफआयआर नोंदविण्यात आले आणि त्याठिकावरून दोन जणांना अटक करण्यात आली. पश्चिम दिल्लीत तीन एफआयआर नोंदविण्यात आले आणि बाह्य दिल्लीत आणखी तीन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. दिल्लीच्या मध्यभागी असणाऱ्या परिसातून 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तिथे दोन FIR दाखल करण्यात आले आहे आहेत. दोन एफआयआर रोहिणीमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे दोघांना अटक करण्यात आली आहे. पूर्व दिल्लीत एक एफआयआर नोंदवण्यात आली असून तिथे चौघांना अटक करण्यात आली आहे. द्वारका परिसरात एक एफआयआर दाखल करण्यात आली असून तिथून दोघांना अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राने आज तरुण नेतृत्व, संसदरत्न राजीवजी सातवांना गमवले’, विनायक मेटेंनी व्यक्त केल्या भावना
- संकटात भर : चक्रीवादळाचा कोकणासह मुंबईतील ऑक्सिजन प्रकल्पांना धोका; सतर्कतेचे आदेश
- बॉलीवूड अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडिल अभिनेता के डी चंद्रन यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन
- ‘मेसेज आला तरच लस घ्यायला या’, आता ज्येष्ठांना देखील करावी लागणार ऑनलाईन नोंदणी
- लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का? सतिश चव्हाणांचा मोदींना सवाल!


