बीड: काँग्रेस खासदार तसेच शांत स्वभावाचे नेता अशी ओळख असलेले राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
काँग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनाने निधन झालं आहे. महाराष्ट्राचे तरुण नेतृत्व, संसदरत्न राजीवजी सातव यांचे दु: खद निधन झाल्याने देशाने तसेच कॉंग्रेस पक्षाने एक मोठा नेता गमवला आहे, अशा भावना शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे. राजीव सातवतांच्या निधनांने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात ही मोठी हानी झाली आहे. देशाच्या राजकारणात राजीव सातव यांचा संक्रीय सहभाग होता. त्यांच्या मेहनतीने ते गल्ली ते दिल्ली हा प्रवास करत होते, परंतु त्यांचे अकाली निधन झाल्याने आज सातव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, सातव परिवाराच्या दु: खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत तसेच महाराष्ट्राने एक तरुण नेता आज गमवला आहे, अशा भावना शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मागील २३ दिवसांपासून राजीव सातव आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत शिवसेना-एमआयएमच्या वादात प्रलंबित राहिलेल्या ‘या’ कामास मिळाली गती!
- संकटात भर : चक्रीवादळाचा कोकणासह मुंबईतील ऑक्सिजन प्रकल्पांना धोका; सतर्कतेचे आदेश
- बॉलीवूड अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडिल अभिनेता के डी चंद्रन यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन
- ‘मेसेज आला तरच लस घ्यायला या’, आता ज्येष्ठांना देखील करावी लागणार ऑनलाईन नोंदणी
- लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का? सतिश चव्हाणांचा मोदींना सवाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

