Share

लॉकडाऊनमुळे लग्नाच्या १३ वर्षानंतर पहिल्यांदाच पती-पत्नीप्रमाणे राहता आले; अभिनेत्री नीना गुप्ताने सांगितला अनुभव

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहेत. कोरोना संसर्गाची ही साखली तोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउन जाहिर केले आहे. या लॉकडाउन मुळे चित्रीकरण बंद असल्याने अनेक कलाकार घरीच बसलेले आहेत.

याच लॉकडाउनचा एक वेगळा अनुभव बॉलीवूड अभिनेत्री निना गुप्ता यांनी शेअर केला आहे. विवेक मेहरा यांच्यासोबत त्यांचा विवाह २००८ साली झाला होता. मात्र कामाच्या व्यापामुळे ते दोघे कधिच नवरा-बायको प्रमाणे वागले नाही. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना ही संधी चालुन आली आणि लग्नाच्या १३ वर्षानंतर ते दोघे खऱ्या आर्थाने नवरा-बायको प्रमाणे राहु शकले. या काळात त्यांना एकमेकांना जाणुन घेण्याची संधी मिळाली. असं निना गुप्ता यांनी सांगितले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात त्या आणि त्यांचे पती दोघे मुक्तेश्वरला होते. तिथे दोघांनी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघेही पती- पत्नीप्रमाणे वागले असं नीना यांनी सांगितलं. याआधी नीना यांचे पती कामामुळे दिल्लीत तर नीना या मुंबईत असायच्या त्यामुळे त्यांना एकत्र जास्त वेळ व्यक्त करता आला नव्हता. एका विमान प्रवासात विवेक आणि नीना यांची पहिली भेट झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. काही वर्षांनी त्यांनी लग्न केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!