मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे व्हायरल झाली आहेत. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय. चौकशी अहवालातून दूध का दूध पानी का पानी झालंय, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे, असा हल्लाबोल मुश्रीफ यांनी केला आहे.
याच मुद्द्यावर अधिक बोलताना ते म्हणाले कि, ‘सीबीआयच्या प्राथमिक अहवालात आमचे नेते अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याची माहिती कळते आहे. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे होते, हे सिद्ध झालंय. दूध का दूध पानी का पानी झालं, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे.’ असा आक्रमक पवित्रा मुश्रीफ यांनी घेतला असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजितदादा, मग आता सुप्रियाताई, रोहित पवारांनाही पोलिसांना उचलायला सांगणार का?’
- ‘वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्याने जीव दिला, अन् अनिल परब नसते उद्योग करतोय’, निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘तुम्ही बिनबापाचे आहात काय?..,’ संजय राऊतांनी राणेपुत्रांना शब्दांनी झोडपले
- ‘पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते’, पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
- ‘संजय राऊत बोगस माणूस, त्याचा जिथे दिसेल तिथे ‘करेक्ट’ कार्यक्रम करूत’, निलेश राणेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
