Share

परमबीर सिंहांचा पत्ता लागेना; वेतन थांबविले, सहभागी २५ पोलीस अधिकारी होणार निलंबीत

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा पत्ता शोधण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र आतापर्यंत त्यांनी कुणालाही सुगावा लागू दिला नाही. परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे दाखल आहेत. त्यात तीन वसूली व एक अॅट्रोसिटीचा गुन्हा आहे. आता पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात परमबिर सिंह यांच्यासह एकूण २५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच परमबिर सिंह यांचे वेतन थांबविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबिर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून ते व्हायरल करत गृहमंत्री अनिल देशमुखांसह राज्य सरकारला अडचणीत आणले होते. आता राज्याच्या पोलीस विभागाने परमबिर सिंहाचे वेतन थांबवून त्यांना फरार घोषित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

परमबीर सिंह यांची राज्याच्या गृहरक्षक दलाचे महासंचालक पदी बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी २० मार्च २०२१ रोजी हे पत्र लिहील्यानंतर आठ दिवसांची रजा घेत चंदीगड येथील निवासस्थानी गेले. त्यानंतर त्यांनी तेथूनच पंधरा दिवसांची रजा वाढवली. त्यानंतर दर पंधरा दिवसांनी रजा वाढवत राहिले. त्यांचा अटक वारंट निघाल्यानंतर ते फरार झाले असून अजुनही फरारच आहेत. आत्तापर्यंत झालेल्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे एकदाही हजर राहिले नाहीत.

परमबीर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता. याच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाने सिंह यांना वारंवार समन्स बजावले. परंतु, सिंह एकाही समन्सनंतर चौकशी समितीसमोर हजर राहीले नाहीत. त्यामुळे त्यांचा अटक वारंट काढण्यात आला आहे. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!