Share

‘परमबीर सिंह पळून गेलेले नाहीत, त्यांना पळवून लावलंय’, संजय राऊतांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपावरून मनी लॉन्ड्रिग प्रकरणात ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, यातील परमबीर सिंह हेच अनेक दिवसांपासून गायब झालेत.

यावर केंद्राच्याच मदतीनं देशाबाहेर पळून जाता येतं असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह सध्या कुठे आहेत? अशा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

‘देशमुखांवर आरोप करणारे जे लोकं आहेत ते आरोप करून पळून गेले नाही. त्यांना पळवून लावले आहे. पळून जाणारा व्यक्ती केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. पोलीस खात्याचा आयुक्त असलेला अधिकारी हा देश सोडून जातो. तेव्हा केंद्रीय सत्तेचं पाठबळ असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. त्याने आरोप केला आणि पळून गेला. त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते. चौकशी होऊ शकते. तपास होऊ शकतो. पण मला वाटतं हे सर्व ठरवून चाललं आहे. महाविकास आघाडीतील जे प्रमुख लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचा आणि बदनामी केली जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!