नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यातील 36 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना दुबईमध्ये दुपारी 3.30 पासून खेळला जाईल. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली मजबूत फॉर्ममध्ये आहे तर संजू सॅमसनचा संघ वेग घेत आहे. दिल्लीने गेल्या सामन्यांमध्ये नेत्रदीपक विजय नोंदवला आहे, तर राजस्थानलाही रोमांचक विजय मिळाला आहे.
हा सामना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्यासाठी महत्त्वाचा आहे. पंत सामन्यात पंतकडे वीरेंद्र सेहवागनं दिल्लीसाठी केलेला एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघासाठी सर्वाधिक रन करण्याचा विक्रम हा वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागनं 2008 ते 2013 या काळात दिल्लीसाठी आयपीएल खेळले. या काळात त्यानं 85 इनिंगमध्ये 2382 रन काढले आहेत.
तर ऋषभ पंतनं दिल्लीसाठी 77 इनिंगमध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकाच्या जोरावर 2327 रन काढले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 150.03 इतका असून सरासरी 35.80 आहे. त्यामुळे पंतला आता श्रेयस अय्यरला मागं टाकण्यासाठी आणखी 56 रनची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंपनीने असमर्थता दर्शविल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली – टोपे
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’; सनरायझर्स हैदराबाद समोर टिकणार का पंजाब किंग्स?
- भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार, 56 विमानांच्या खरेदी करण्याकरिता स्पेनच्या कंपनीसोबत करार
- काँग्रेसला देशात पुन्हा एकदा सोनियाचे दिवस येतील – बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
