Share

वैयक्तिक कामे केली नाहीत, हा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा -पंकजा मुंडे

Published On: 

अंबाजोगाई : सत्तेच्या माध्यमातून मी मतदारसंघात कोट्यवधीचा निधी देऊन रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, बचतगट भवन, महिलांचे सक्षमीकरण हे सगळं केलं, विकासाची कामे करण्याबरोबरच लोकांच्या बदल्यांची कामे असो, आरोग्याची कामे असो की इतर अनेक किरकोळ कामे केली, विरोधक यावरून जे आरोप करतात ते बिनबुडाचे आहेत. सत्ता असताना राष्ट्रवादीने विकासासाठी फुटकी कवडी देखील नाही असा घणाघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला. दरम्यान, धनंजय मुंडे हे बोगस नेता आहे, त्यांच्या नादी लागू नका, तुमचही वाटोळे केल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका जि.प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केली.

पंकजा मुंडे यांच्या जवळगांव व राडी येथे आज मराठा बेल्टमध्ये झालेल्या जाहीर सभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला, त्यांना पाहण्यासाठी महिला, आबालवृद्ध व तरूणांनी मोठी गर्दी केली होती. माजी आमदार गोविंदराव केंद्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, जीवनराव किर्दंत, उषाताई किर्दंत, शामराव आपेट, राम कुलकर्णी, दिलीप गिते, प्रदीप गंगणे, अच्यूत गंगणे, गणेश कराड आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आपल्या भागाच्या विकासासाठी फुटकी कवडीही दिली नाही आणि आता विकासाच्या गप्पा मारून मत मागत आहेत. मत मागण्याचा यांना नैतिक अधिकार तरी आहे का असा सवाल करून सत्तेच्या केवळ भ्रष्टाचार करून जनतेला वाऱ्यावर सोडणारांना धडा शिकवून विकासाला गती देण्यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. मी मंत्री झाल्यानंतर या भागातील विकासाला सुरुवात झाली. पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, महिला सक्षमीकरण अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आणुन विकासाला चालना दिली.

मात्र विरोधकांना हा विकास दिसत. त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे पण मी त्यासाठीही महाआरोग्य शिबिर घेऊन सामान्यांची सेवा केली. पण विरोधकांना माझ्या विरोधाचा रोग झाला आहे म्हणून त्यांना माझे चांगले काम दिसतच नाही असा हल्ला करून सामान्य जनतेला मात्र मी केलेला विकास दिसतो आहे. म्हणुनच मतदारांचा मला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळेच माझ्या विरोधात अपप्रचार केला जात आहे पण जनता त्यांच्या अफवा तंत्रांना बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1184365105221259264?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1184363189107970051?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1184362016036622337?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1184358690737946624?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!